‘वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि’
मित्रानो, आज आपण महादजी शिंदे यांच्या जीवनाचा एक आगळावेगळा पैलू उलगडून पाहणार आहोत. महादजी शिंदे यांनी आयुष्यभर हातात तलवार धरली आणि लढाया केल्या हे सर्वास ठाऊक आहेच. परंतु ज्या हातात त्यांनी तलवार धरली त्याच हातात नित्यनियमाने स्मरणी सुद्धा धरली व सवड मिळेल तेव्हा त्याच हातात लेखणी सुद्धा धरली.