२८ जुलै १७८७, लालसोटचा रणसंग्राम

मराठे आणि राजपुतांच्यामध्ये झालेल्या लालसोट च्या चित्तथरारक लढाईचा परामर्श. महादजींनी आपली मनाची स्थिरता अजिबात ढळू न देता, संयम दाखवत मराठयांना सुखरूप परत कसे आणले, त्याची चित्तवेधक कहाणी.

‘वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि’

मित्रानो, आज आपण महादजी शिंदे यांच्या जीवनाचा एक आगळावेगळा पैलू उलगडून पाहणार आहोत. महादजी शिंदे यांनी आयुष्यभर हातात तलवार धरली आणि लढाया केल्या हे सर्वास ठाऊक आहेच. परंतु ज्या हातात त्यांनी तलवार धरली त्याच हातात नित्यनियमाने स्मरणी सुद्धा धरली व सवड मिळेल तेव्हा त्याच हातात लेखणी सुद्धा धरली.

error: