Category Archives: मराठी दौलत

Maratha Artillery

२८ जुलै १७८७, लालसोटचा रणसंग्राम

मराठे आणि राजपुतांच्यामध्ये झालेल्या लालसोट च्या चित्तथरारक लढाईचा परामर्श. महादजींनी आपली मनाची स्थिरता अजिबात ढळू न देता, संयम दाखवत मराठयांना सुखरूप परत कसे आणले, त्याची चित्तवेधक कहाणी. …

‘वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि’

मित्रानो, आज आपण महादजी शिंदे यांच्या जीवनाचा एक आगळावेगळा पैलू उलगडून पाहणार आहोत. महादजी शिंदे यांनी आयुष्यभर हातात तलवार धरली आणि लढाया केल्या हे सर्वास ठाऊक आहेच. परंतु ज्या हातात त्यांनी तलवार धरली त्याच हातात नित्यनियमाने स्मरणी सुद्धा धरली व सवड मिळेल तेव्हा त्याच हातात लेखणी सुद्धा धरली. …

कवायती फौजेचा पगार

गेल्या दोन लेखामध्ये आपण उत्तर मराठेशाहीतील मराठ्यांच्या फौजेच्या पगाराची माहिती घेतली. त्याच धर्तीवर या लेखात मराठेशाहीतील कवायती फौजेतील सैनिकांच्या पगाराबद्दल थोडी माहिती घेऊ या.इंग्रज लोंकांचे हिंदुस्थानात आगमन झाले ते खरे तर व्यापाराच्या निमित्ताने. पण थोड्याच काळात त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी हळूहळू हिंदुस्थानात आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. मराठेशाहीतील कवायती कवायती फौजेचा उद्गाता हे महादजी शिंदे होत. त्यांच्यापूर्वी सुद्धा काही मराठी सरदाराकडे थोड्या फार प्रमाणात बंदूकधारी सैनिक होते, परंतु त्यांचे प्रमाण प्रमुख फौजेशी तुलना करता अगदी नगण्य होते.उत्तर मराठेशाहीत कवायती फौज शून्यातून उभारून त्याचा पुरेपूर उपयोग करणारे सेनापती म्हणजे महादजी शिंदे. या कामासाठी त्यांनी फ्रेंच योद्धा डी बॉयन याची नेमणूक केली होती व त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले होते. महादजी शिंदे यांची अजिंक्य सेना:डी बॉयन हा फ्रांसमध्ये जन्मला पण त्याचे मन भारतात रमले. तो एक लष्करीरित्या परिपूर्ण असा अवलिया होता. फ्रान्समधून तो मध्य पूर्वेत आला, तेथे त्याने बऱ्याच लहान मोठ्या लढयात भाग घेतला व शेवटी तो त्याची स्वप्नभूमी(dreamland)भारतात आला. त्याची महादजीबरोबर योगायोगानेच गाठ पडली.महादजी हे खऱ्या अर्थाने रत्नपारखी असल्याने त्यांनी डी बॉयनचे गुण हेरून आपल्याकडे नोकरीला ठेवले. त्याच्याकडून महादजीनी कवायती फौज तयार करून घेतली व काही वर्षातच ती आशिया खंडातील एक अजिंक्य सेना म्हणून नावारूपाला आली.त्या काळात कवायती फौजेचे मुख्यतः तीन भाग असत. १.पायदळ(Infantry)२.तोफखाना(Artillery) व ३. घोडदळ(Cavalry). कवायती सैन्यामध्ये जे सर्वात लहान युनिट असे त्याला कंपनी म्हणत, त्यालाच मराठे अपभ्रंश स्वरूपात ‘कंपू’ संबोधित. प्रत्येक दलातील सैनिकांची लढाई करण्याची पद्धती वेगवेगळी होती. त्यानुसार सैनिकांची, त्यावरील अधिकाऱ्यांची व इतर सेवा पुरविणाऱ्या लोकांची संख्या, त्यांचे हुद्दे व पगार भिन्न भिन्न होते.कवायती फौजेतील सैनिकांचे वेतन: प्रत्येक दलातील सैनिकांची संख्या व त्यांचे स्वरूप याची तपशीलवार माहिती आपण आगामी लेखात घेणार आहोत. या लेखात सैनिकांचे व अधिकाऱ्यांचे हुद्दे व त्यांना मिळणारे मासिक वेतन यावर लक्ष केंद्रित करू या.पायदळ(Infantry) : लोकांचे हुद्दे व त्यांचे मासिक वेतन खालीलप्रमाणे (रुपये) सुभेदार: ४०, जमादार:२० , कोर्ट हवालदार १२ किंवा ८, हवालदार १० किंवा ८ , नाईक ८,…

मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९०००

मराठेशाहीतील सैनिकांच्या पगाराच्या पद्धतीबद्दलचा माझा मागील लेख वाचून माझ्या काही हितचिंतक मित्रांनी व वाचकांनी त्या संदर्भात काही प्रश्न व शंका उपस्थित केल्या. त्या वाचून मला ही बरं वाटलं.कारण याचा अर्थ तुम्ही माझा लेख लक्षपूर्वक वाचत आहात याचे हे एक प्रमाणपत्र होते. काहीं वाचकांनी शंका विचारली की लढाईत जखमी झालेल्या सैनिकांना पगार मिळायचा का? व मिळाल्यास त्याचे स्वरूप व प्रणाली कशी होती ? तसेच लढाईत शाहिद झालेल्या सैनिकांच्या वेतनाचे काय होत असे? लढाईत ‘मृत’ पावलेल्या सैनिकांच्या पगाराबद्दल प्रश्न करणारे वाचक निश्चितच ‘जागृत’पणे लेखाचे वाचन करीत होते यात शंका नाही. त्या अनुषंगाने इतिहासाचा धांडोळा घेताना लढाईत जखमी झालेल्या किंवा मृत पावलेल्या सैनिकांबद्दलचे काही उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळले आणि ते निश्चितच त्या काळात सुद्धा मराठेशाहीत आपल्या सैनिकांची कशी पुरेपूर काळजी घेतली जायची त्याचे ते द्योतकच होते. सैन्य हे नेहमी पोटावर चालते अशी आपल्याकडे एक फार जुनी म्हण आहे, मग तो लढणारा सैनिक असो वा जखमी झालेला! मराठ्यांच्या लढायांचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने वाटते ती म्हणजे त्या काळात जर आयसओ ९००० (ISO9000) प्रकारचे एखादे जागतिक कीर्तीचे प्रमाणपत्र असते तर मराठे सैन्याला सहज मिळाले असते. मी असे का म्हणतो त्याचे विवेचन पुढे देत आहे. सैनिक भरतीची प्रक्रिया: मागच्या लेखात म्हंटल्याप्रमाणे मराठ्यांच्या फौजेत प्रत्येक सैनिकाची रीतसर पद्धतीने फौजेत भरती (recruitment process based on skills profile, past experience etc.) केली जायची. सैनिकाचे नाव, गांव, वय,जात,तसेच स्वतःचा घोडा आहे किंवा नाही, सैनिक कोणत्या प्रकारचा आहे, पायदळ का घोडदळ का बंदूकधारी का धनुर्धारी का दाणपट्ट्याने लढणारा इत्यादींची नोंद केलेली असे. तसेच त्याचा मोहिमेतील ठरलेला पगार, त्याला दिलेली अग्रीम रक्कम (ऍडव्हान्स) याचा सुद्धा उल्लेख नोंदवहीत असे. जखमी सैनिकांच्या उपचाराची प्रक्रिया: जखमी सैनिकास उपचार करताना एक ठरलेली पद्धत मराठे अंमलात आणीत असत. ही पद्धत एखाद्या आयसओ प्रक्रियेसारखीच होती. लढाईत सैनिकाला जर इजा झाली तर त्याला मुख्य लढाईतून बाजूला काढून त्यांची लगेच नोंद केली (Incident recording ) जायची. त्याला झालेल्या जखमेबद्दल नोंद झाल्यावर त्याचे विश्लेषण (incident analysis) केले जायचे. झालेली…

मराठेशाहीतील सैनिकांचे पगार व भत्ते याची काळाच्या कसोटीवर उतरलेली शास्त्रीय व पारदर्शक पद्धत

Salary Administration during Maratha period काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये ‘वन रँक,वन पेन्शन’ ही निवृत्त सैनिकांसाठीच्या वेतनासंबंधी योजना जाहीर झाली होती हे आपल्याला आठवत असेलच. या योजनेबद्दल देशभर वादविवाद सुद्धा झाले होते. या पार्श्वभूमीवर मराठेशाहीत साधारणपणे ३०० वर्षांपूर्वी आपल्या सैनिकांचे पगार व भत्ते कसे होते हे जाणून घेणे हा एक कुतूहलाचा विषय ठरतो. मराठे सैनिक हे मुळात शेतकरी होते. शेतीची कामे आटोपून ते लढाईच्या मोहिमांमध्ये भाग घेत असत. त्या काळात देखील सैनिकांचा पगार व भत्ते ठरविणे व त्याचे योग्य वेळेस वितरण करणे याची मराठ्यांची एक शास्त्रीय व पारदर्शक अशी पद्धत होती. आपल्या सैनिकांचा पगार ठरविताना त्यांचा हुद्दा, त्यांचा पूर्वलढायांचा अनुभव व शस्त्रे चालविण्याचे कसब (Bio data) लक्षात घेतले जात असे. सैनिकाचे वेतन एका मोसमापुरतेच ठरलेले असे. हिंदुस्थानातील लढायांचा मोसम नेहमी पावसाळा संपल्यावरच सुरु होत असे व उन्हाळ्याच्या अखेर पर्यंत संपत असे. मोसम संपला की सैनिक आपल्या गावी घरी परत जात असे व पुढील मसलतीचे बोलावणे येईपर्यँत स्वतःला शेतावरील कामात गुंतून घेत असे. सरदारांना दिलेली जहागिरी व सैनिकांचे संख्याबळ: मराठेशाहीत प्रत्येक सरदाराला व अम्मलदाराला त्याच्या योग्यतेनुसार जहागिरी म्हणून काही वसुलीचा प्रांत पिढीजात असा नेमून दिलेला असे.त्या प्रांतातील शेतसारा त्याने गोळा करावा व आपला सैन्याचा खर्च भागवावा अशी व्यवस्था असे. त्या सरदाराला नेमून दिलेल्या जहागिरीनुसार आपल्याकडे तेवढे सैन्य बाळगावे लागे.शेतसाऱ्याचे उत्पन्न , फौजेतील सैनिकांची संख्या या गोष्टीची रीतसर तपासणी (Audit ) होत असे. प्रांतातून येणाऱ्या वसुलीचा निम्मा हिस्सा मृग नक्षत्र (पावसाळा) सुरु होताच तालुक्याच्या मामलेदारांनी पदरचा आगाऊ ‘रसद’ म्हणून (Advance)द्यावा ,बाकीचा हिस्सा तीन किंवा चार हप्त्यांमध्ये(installments)द्यावा , ही सर्व रक्कम मामलेदाराने आगाऊ दिलेल्या पैशाच्या व्याजासकट वर्ष संपेपर्यंत त्यांनी तालुक्यातून हुकुमानुसार वसूल करून घ्यावी अशी त्याकाळी पद्धत होती. वसुलीच्या रकमेचा ठरवलेला आकडा (Budgeted tax accrual)सरकारातून दरवर्षी मामलेदारास दिलेला असे. आगाऊ ‘रसद’ (Advance)ही जेष्ठ महिन्यापासून हाती येऊ लागताच पावसाळ्यानंतर जी मोहीम ठरली असेल त्याकरता कोणास तीन हजार, कोणास पाच हजार, कोणास दहा हजार तर कोणास अगदी हजार,पाचशे, दोनशेसुद्धा स्वार चाकरीस ठेवण्याविषयी सरकारातून सरदारास हुकूम दिला…

शिलंगणाचे सोने

STOTRAMALAA Garland of Hindu Prayers आज दसऱ्याचा निमित्ताने लिहिलेला ‘शिलंगणाचे सोने’ असे शीर्षक दिलेला हा लेख ! हे शिलंगणाचे सोने आहे मराठीतील संत साहित्याचे. आणि हे सोने लुटणारा पुरुष आहे अमेरिकेतील न्यू जर्सीचा रहिवासी एक अप्रसिद्ध डॉक्टर जस्टिन ऑबॉट (Dr. Justin Abbott)!! जन्माने अमेरिकन असणारा हा माणूस भारतातच रमला आणि आयुष्याची बरीच वर्षे त्याने महाराष्ट्रात व्यतीत केली. महाराष्ट्राच्या अनेक शहरात, खेड्यात, सुपीक दऱ्याखोऱ्यात व सौंदर्याने नटलेल्या पर्वतात तो फिरला. आणि अशी फिरस्ती करता करता महाराष्ट्रातील संत साहित्याच्या प्रेमात पडला. मराठीतील अनेक संतांच्या लिखाणाचा त्याने गाढा अभ्यास केला आणि त्या साहित्यातील त्याला मनापासून आवडलेल्या काही कविता त्याने स्वतः वेचून काढल्या आणि त्या काव्यपुष्पांचा त्याने बनवला एक सुरेख सुंदर पुष्पहार आणि अर्पण केला एका पुस्तकाच्या स्वरूपात. या पुस्तकाचे नाव आहे स्तोत्रमाला, हिंदू प्रार्थनांचा एक हार. आजपासून बरोबर ९१वर्षांपूर्वी म्हणजे सन १९२९ मध्ये प्रकाशित केलेले हे पुस्तक या अमेरिकन पाहुण्याने अवघ्या महाराष्ट्राला, मराठी संतांना, महाराष्ट्राच्या संतभूमीला अर्पण केलेले आहे. त्याने ज्या दिवशी हे पुस्तक लिहून संपवले तेव्हा तो ७५ वर्षे वयाचा ‘तरुण’ होता. मराठी संतसाहित्याने झपाटलेल्या जस्टिनने ज्या संतांचा अभ्यास केला त्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानदेव,नामदेव, भानुदास,एकनाथ, तुकाराम,रामदास, दिनकर,केशव, त्र्यंबक,देवदास, मोरोपंत आणि महिपती इत्यादींच्या साहित्याचा समावेश होतो.जस्टिन यांनी उल्लेख केलेल्या काही कवींची नांवे माझ्यासारख्या अनेकांना नवीन असतील असे वाटते. त्यामुळे काहींची त्रोटक माहिती पुस्तकातून इथे दिली आहे. कवी त्र्यंबक हा एकनाथ महाराजांच्या शिष्यापैकी एक असावा. केशव नावाचे कवी म्हणजे केशवस्वामी होत. हे भागानगर (निझामाचा हैदराबाद प्रांत) येथे वास्तव्यास होते. त्यांच्या गुरुचे नाव काशीराजस्वामी. त्यांनी ‘एकादशीचरित्र’ नावाचा ग्रंथ ओवीबद्ध केला होता.आश्चर्याची व गंमतीची गोष्ट म्हणजे देवदास यांनी रचलेले व्यंकटेश्वर स्तोत्र अमेरिकेतील सुप्रसिद्ध येल विद्यापीठातील ग्रंथालयात उपलब्ध आहे.डॉक्टर जस्टिन यांनी त्या ग्रंथालयातून ते जसेच्या तसे घेतलेले आहे.मूळ हस्तलिखितात नसलेल्या ओळी त्यांनी प्रयत्नपूर्वक वेगळ्या दिलेल्या आहेत.या मराठीतील काव्य समजावून घेण्यासाठी त्यांना मदत केली त्यात पंडित नरहर गोडबोले हे प्रमुख होते असे त्याने कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे.त्याने आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हंटले आहे की हे पुस्तक लिहून झाल्यावर त्याच्या…